esakal | उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

बोलून बातमी शोधा

Ujanis water

जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरशः झोपच उडाली आहे.

उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर
sakal_logo
By
राजाराम माने

केतूर (सोलापूर) : सोलापूर पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाचा पाणीसाठा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेला म्हणजेच 111 टक्के असतानाही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो केवळ 20 टक्‍क्‍यांवर आला आहे. जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात पिके वाचविण्यासाठी अक्षरशः झोपच उडाली आहे.

गतवर्षी पुणे जिल्हा व परिसर तसेच भीमाखोऱ्यात झालेल्या जोरदार पावसाच्या बळावर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही. या भरवशावर निर्धास्त होता. परंतु सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्याने पुन्हा एकदा पाण्याचे संकट सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी जलाशयाच्या पाणीसाठा सध्या 20 टक्के वरच आला आहे.

हेही वाचा: बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे

पाणीसाठा वरचेवर झपाट्याने कमी होत असल्याने लाभ क्षेत्रातील, सखल भागातील शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मोठी धावपळ व पळापळ सुरू झाली आहे. पाईप, केबल, मोटारी पाणी पुढे जाईल. तसतसे वाढवावे लागत आहेत. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जलाशयाचा पाणीसाठा मायनस मध्ये जाणार असल्याने शेतकरी हबकून गेला आहे. उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत असताना व पिकांना पाण्याची गरज असताना पाणीसाठा मात्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी धावपळ पळापळ सुरू आहे. आगामी काळात पिके वाचविण्यासाठी शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"पावसाळ्यात पाणी साठा भरपूर असतानाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

- हरिश्चंद्र खाटमोडे, केतूर

" इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या धरणग्रस्त इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे, त्याप्रमाणेच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांसाठी पाणी राखीव ठेवणे गरजेचे झाले आहे.

- अँड. अजित विघ्ने, केतूर

" धरण निर्मितीसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या नशिबी ४० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष कायम ठरलेलेच आहे. यात बदल होणे गरजेचे आहे .

- अशोक पाटील, केतूर

" सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी विरोध नाही परंतु पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळून पाणी वाया न घालवता पाणी जपून वापरावे असेच वाटते.

- श्रीकांत साखरे, राजुरी