
वैराग : उक्कडगाव (ता. बार्शी) येथे असलेल्या जमीन तसेच विहीर आणि बोअरचे पाणी देणार नाही, आम्ही मिटवून घेणार नाही याबाबत बार्शी न्यायालयात खटला सुरू असताना गावातच डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता करीत एकास जन्मठेप व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी ठोठावली.