
-दिनेश माने-देशमुख
बोंडले : धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥
संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥
आज पालखी मार्गावरील बोंडले (ता. माळशिरस) येथे वरुणराजाच्या साक्षीने जगद्गुरू तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या भेटीचा अनोखा सोहळा रंगला. लक्ष लक्ष नयनांनी हा सोहळा पाहताना वारकऱ्यांच्या ‘माउली माउली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.