दुर्दैवी घटना: अंगावर विज पडून महिलेसह गाईचा मृत्यू , परिसरात हळहळ

दुर्दैवी घटना: अंगावर विज पडून महिलेसह गाईचा मृत्यू , परिसरात हळहळ

Mohal News: गोठ्या बाहेर बांधलेली गाय गोठ्यात आणत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एका महिलेचा व गायीचा मुत्यु झाल्याची घटना पापरी ता मोहोळ येथे बुधवार ता 22 रोजी दुपारी 4.30 वाजता घडली.छाया बळीराम कासार वय 40 रा पापरी असे मृत महिलेचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार पापरी येथील बळीराम कासार यांना आठ जनावरे आहेत. दुपारी साडेचार वाजता सर्वजण गोठ्यात बसले होते.

दुर्दैवी घटना: अंगावर विज पडून महिलेसह गाईचा मृत्यू , परिसरात हळहळ
Untimely Rain : निलंगा तालुक्यात पून्हा पावसाने झोडपले; विज पडून एकाचा मृत्यू, पीकाचे नुकसान

त्याचवेळी पाऊस व वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. यावेळी छाया ही गोठया बाहेर असलेली गाय गोठ्यात बांधण्यासाठी घेऊन येत असताना अचानक आकाशातून मोठा आवाज झाला, व मोठा उजेड पडला.

त्यावेळी बळीराम कासार हे घाबरून बाहेर आले असता पत्नी छाया ही घरासमोर पडलेली दिसली, तर जी गाय गोठ्यात आणावयाची होती ती गाय ही गोठ्यासमोर पडलेली दिसली.

दुर्दैवी घटना: अंगावर विज पडून महिलेसह गाईचा मृत्यू , परिसरात हळहळ
विज पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचे सांत्वन

यावेळी बळीराम कासार यांनी त्यांच्या मुलाला व दुसऱ्या नातेवाईकाला बोलावले. सर्वांनी छाया जवळ जाऊन पाहिले असता तिची कसलीही हालचाल होत नसल्याचे दिसले. बळीराम यांनी पत्नीला जोरदार आवाज दिला असता तिचा कोणताच प्रतिसाद आला नाही.

तातडीने पत्नी छाया हीस उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला उपचारा पूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची खबर बळीराम मनोहर कासार वय 45 रा पापरी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

दुर्दैवी घटना: अंगावर विज पडून महिलेसह गाईचा मृत्यू , परिसरात हळहळ
बारामतीत विज पडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यु, एक गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com