esakal | गुटखा वाहतुकीची अनोखी शक्‍कल! ट्रकमध्ये सुरवातीला गुटखा अन्‌ मागे भरली होती बेसनची पोती पण... 
sakal

बोलून बातमी शोधा

3Gutkha_6 - Copy.jpg

'यांच्या' पथकाची कारवाई 
लॉकडाउनमध्ये गुटखा तथा तंबाखूजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर चोरट्या मार्गाने त्याची वाहतूक सुरू झाली असून विजापूर नाका पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विजापूर नाका पोलिसांनी तो ट्रक आसरा चौक परिसरात अडविला. सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, भीमाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, लखन माळी, रोहन ढावरे, आलम बिराजदार, विशाल बोराडे, बालाजी जाधव आणि लक्ष्मण वसेकर यांनी ही कारवाई केली.

गुटखा वाहतुकीची अनोखी शक्‍कल! ट्रकमध्ये सुरवातीला गुटखा अन्‌ मागे भरली होती बेसनची पोती पण... 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मुलतानी बेकरीकडून आसरा चौकाकडे रस्त्याच्या विरुध्द दिशेने जाणारा ट्रक विजापूर नाका पोलिसांनी अडविला. ट्रकमध्ये काय माल आहे, अशी विचारणा केल्यानंतर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुप्तहेरामार्फत माहिती मिळाल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यावेळी मागील बाजूस बेसन पोती आणि आतील बाजूस गुटख्याची 50 पोती असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू झाला आहे. 

जोडभावी पोलिस ठाण्याजवळील श्री आळंद मोटार गुड्‌सच्या गोडावूनमधून 50 पोती गुटख्याची भरुन तो ट्रक (एमएच-06, एक्‍यू-8142) यादगिरी (कर्नाटक) येथे निघाला होता. संजीव सिध्दलिंग कोळी (रा. सन्मित्र नगर, शेळगी) याने तो माल भरला होता. गुटखा लपविण्यासाठी ट्रकच्या मागील बाजूस मुलतानी बेकरी येथून बेसनची पोती भरली होती. हा माल कर्नाटकातील यादगिरी येथे पोहच करण्यास संजीव कोळी याने सांगितले होते, अशी माहिती ट्रक चालक कल्याणी शंकर तेजमने (मटकी रोड, आळंद, जि. कलबुर्गी) याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कोळी याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा (50 पोती) आणि बेसन व ट्रक असा 35 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

'यांच्या' पथकाची कारवाई 
लॉकडाउनमध्ये गुटखा तथा तंबाखूजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर चोरट्या मार्गाने त्याची वाहतूक सुरू झाली असून विजापूर नाका पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विजापूर नाका पोलिसांनी तो ट्रक आसरा चौक परिसरात अडविला. सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, भीमाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, लखन माळी, रोहन ढावरे, आलम बिराजदार, विशाल बोराडे, बालाजी जाधव आणि लक्ष्मण वसेकर यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top