esakal | अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून! माढा तालुक्‍यातील शेवरे येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून! माढा तालुक्‍यातील शेवरे येथील घटना

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी : अज्ञात व्यक्तीचा मफलरने गळा आवळून खून केला असून ओळख पटू नये, म्हणून दोन्ही हातपाय बांधून उजनी कालव्याच्या पाण्यामध्ये तो मृतदेह फेकून दिला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माढा तालुक्‍यातील शेवरे येथील दिलीप श्रीरंग मस्के यांच्या शेतानजिकच्या कालव्यामध्ये या व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह निदर्शनास आला. याप्रकरणी सिध्देश्वर गोरख मस्के (वय-60 रा. शेवरे ता.माढा) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी, शेवरे येथील उजनी कालव्याच्या पाण्यामध्ये सडलेल्या अवस्थेतील मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 असून उंची पाच ते साडेपाच फूट आहे. अंगात काळ्या रंगाची पॅन्ट असून फिक्कट पिवळ्या रंगाचा शर्ट आहे. त्याच्या गळ्याभोवती चॉकलेटी रंगाचा त्यावर पांढरी नक्षी असलेला मफलर आवळलेला होता.

तसेच दोन्ही हातपाय पांढऱ्या रंगाच्या कापडाने बांधलेल्या अवस्थेत हा सडलेला मृतदेह पोलीसांच्या निदर्शनास आला आहे. या वर्णनाच्या व्यक्ती विषयी माहिती असल्यास टेंभुर्णी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.

loading image
go to top