esakal | अनलाॅकमध्ये वाहन वर्दळीच्या प्रदूषणाची होतेय तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

pollution.jpg

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये वायू प्रदूषणाचे आकडे मोठ्या प्रमाणात कमी झालेले होते. यामध्ये हवेत असलेले धुलीकणाचे प्रमाण, वाहनाच्या धुरामधून बाहेर पडणारे वायू या दोन्हींच्या बाबतीत आकडेवारी कमी झाली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिक वाहन घेऊन घराबाहेर पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. जे नागरिक वाहने घेऊन बाहेर पडले त्यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.

अनलाॅकमध्ये वाहन वर्दळीच्या प्रदूषणाची होतेय तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः मागील दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात शहरात थांबलेल्या वाहनांच्या वर्दळीने वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर आता अनलॉकमध्ये वाहनांची वर्दळ वाढली आहे. या बदलत्या स्थितीत प्रदूषण पातळीत झालेले बदल तपासले जात आहेत. 

हेही वाचाः उन्हाळी भुईमूग काढणीस प्रारंभ 

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये वायू प्रदूषणाचे आकडे मोठ्या प्रमाणात कमी झालेले होते. यामध्ये हवेत असलेले धुलीकणाचे प्रमाण, वाहनाच्या धुरामधून बाहेर पडणारे वायू या दोन्हींच्या बाबतीत आकडेवारी कमी झाली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिक वाहन घेऊन घराबाहेर पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. जे नागरिक वाहने घेऊन बाहेर पडले त्यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. तीन हजार वाहने संपूर्ण कालावधीत पोलिसांनी ताब्यात घेत दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे वाहनाच्या वापराला बऱ्यापैकी आळा बसला होता. 

हेही वाचाः व्यसनमुक्तीची ती चळवळ बनलीय अनेकांचा आधार 

या आठवड्यापासून शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे वाहने वापरण्यास नागरिकांना आता परवानगी मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठा सुरू झाल्याने वाहने घेऊन बाजारात येणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढली आहे. त्यासोबत आता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा शहराला वायू प्रदूषणाला तोंड द्यावे लागणार आहे. वाहनांच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूचा त्यामध्ये सर्वात मोठा समावेश आहे. तसेच कच्च्या रस्त्यांच्या भागात देखील धुळीचे प्रदूषण होते. याबाबत प्रदूषण नियंत्रण खात्याकडून प्रदूषणाच्या बदलत्या स्थितीची तपासणीचे काम सुरू झाले आहे.  

loading image