बार्शी तालुक्‍याच्या शिरपेचात पाचव्यांदा मानाचा तुरा; चुंबचा अविनाश जाधवर झाला जिल्हाधिकारी 

Avinash Jadhavar
Avinash Jadhavar
Updated on

बार्शी (सोलापूर) : माझ्या गावाचे नाव देशात रोशन झाले पाहिजे, खूप अभ्यास करीन पण जिल्हाधिकारी होणारच अन्‌ स्वप्न पूर्ण करणारच, अशी जिद्द ठेवली आणि यशस्वी झालो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील वर्षात (2019) घेतलेल्या परीक्षेत 433 रॅंकने जिल्हाधिकारी झालेल्या अविनाश जाधवर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. सुजित बांगर (आयआरएस), रमेश घोलप (आयएएस), अभिजित बांगर (आयएएस), महादेव धारूरकर (आयएएस) यांच्यानंतर अविनाश जाधवर यांनी जिल्हाधिकारी (आयएएस) यश मिळवून पाचव्यांदा तालुक्‍यात मानाचा तुरा रोवला आहे. 

चुंब डोंगरघाटात गाव. घरची परिस्थिती बेताचीच. आठ एकर जिरायत शेती. वडील भीमराव जाधवर नववी उत्तीर्ण तर आई विमल अशिक्षित. एक भाऊ जनार्दन जाधवर वकिली व्यवसायात बार्शीत कार्यरत तर दोन बहिणी विवाह होऊन सासरी नांदत आहेत. जिल्हाधिकारी झालेल्या अविनाश जाधवर यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण चुंब गावातील भगवान बाबा विद्यालय येथे झाले. दहावीमध्ये 84 टक्के गुण मिळाले अन्‌ बार्शीच्या भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीला 88 टक्के गुण मिळाले होते. पुणे येथे ऍग्रिकल्चरला प्रवेश मिळाला. एमएस्सी ऍग्रिकल्चर, राहुरी विद्यापीठ, राहुरी येथे पूर्ण केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोनवेळा परीक्षा दिली पण यश मिळाले नाही. तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो, असे जाधवर यांनी सांगितले. 

मागील तीन वर्षांपासून दिल्ली येथे फक्त अभ्यास अन्‌ अभ्यास... यासाठी खासगी क्‍लासेसमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास केला. जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय, स्वप्न होते. चुंब गावासह तालुक्‍याचे नाव यशोशिखरावर पोचवण्याची जिद्द होती, असेही अविनाश जाधवर यांनी आवर्जून सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Barber Services Become Costlier in Solapur from July 1; New Rates Announced
6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
Marathi News Esakal
www.esakal.com