esakal | अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

road

उर्वरित उड्डाण पूल व छोटे मोठे पूल बनविणे अंतिम टप्यात आहे.

अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट ते सोलापूर (akkalkot-solapur) या भारतमाला योजनेतून होत असलेल्या 38 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग (National Highways) तसेच अक्कलकोट शहराजवळील बाह्यवळण रस्ता याचे एकूण काम 84 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित उड्डाण पूल तसेच इतर छोटी मोठी पुलांचे व इतर काम पूर्ण होण्यास आणखी चार ते पाच महिने लागतील, अशी माहिती 'ग्रील' या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. (the akkalkot solapur highway will be completed in five months)

हेही वाचा: अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणीची लगबग सुरु

श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी अक्कलकोट हे शहर देशातील सर्वच महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरणारा रस्ता म्हणून या महामार्गाचे महत्व अधोरेखित आहे. अक्कलकोट पासून सोलापूर शहराशी जोडण्यासाठी 38 किलोमीटर लांबीचा चार पदरी सिमेंट रस्ता आणि कलबुर्गी आणि गाणगापूरकडे जाणारी जड वाहतूक बाहेरून जावी यासाठी सात किमीचा बाह्यवळण रस्ता बनविणे मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. तो आता अंतिम टप्यात आला असून एकूण कामाच्या 84 टक्के इतका पूर्ण झाला आहे. तर उर्वरित उड्डाण पूल व छोटे मोठे पूल बनविणे अंतिम टप्यात आहे.

हेही वाचा: अक्कलकोट पोलिसांसमोर आव्हान ! सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी

याचा एकूण खर्च 807 कोटी रुपये इतका असून एकूण रस्त्याचा 38.952 किलोमीटर लांबीपैकी 33 किलोमीटर एवढा रस्ता बनवून तयार आहे. आता काही पुलाचा आणि भूसंपादन प्रक्रियेत असलेला रस्त्याच्या भागाचे काम सुरू असून येत्या पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर आणखी वेगवान व विना अडथळ्यांची दळणवळण सेवा प्रवाश्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: अखेर अक्कलकोट भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 84 कार्यकर्त्यांना संधी

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा हा दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे. एन एच 150 ई या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प हायब्रीड ऍन्युईटी मोड मधील हा प्रकल्प जी आर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी पूर्णत्वास नेत आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा तसेच विजयपूर व कलबुर्गीकडे जाण्यास खूपच आरामदायी प्रवास होणार आहे. या मार्गावर टोल उभारणी सुद्धा अंतिम टप्प्यात आली असून येत्या महिनाभरात टोल वसुली सुद्धा आरंभ होणार असल्याचे सांगितले गेले.

हेही वाचा: तब्बल सहा वर्षांपासून फरार अत्याचारी अखेर जेरबंद ! अक्कलकोट उत्तर पोलिसांची कामगिरी 

हा रस्ता होण्यापूर्वी जास्त गर्दीच्या काळात अरुंद रस्त्यामुळे पाणी टाकी जाण्यास सव्वा तास तर स्टँड येथे जाण्यास पावणेदोन तास वेळ लागत होता. तो आता राष्ट्रीय महामार्गाने जोडल्याने वेळ निम्यावर येणार आहे. या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित कुंभारी, वळसंग, कर्जाळ लिंबिचिंचोळी येथील उड्डाण पूल अधिक वेगाने पूर्ण करण्याची आहे. या कामासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, ग्रील आणि स्वतंत्र अभियंता एस ए इन्फ्रा आदींचे सर्व अधिकारी, अभियंते, अधिकारी व कामगार वर्ग यांचा अथक परिश्रम सदर रस्ता वेळेवर पूर्ण होण्यास कारणीभूत आहे.

हेही वाचा: भीतीतून दिलासाकडे वाटचाल ! अक्कलकोट येथे कोविशिल्ड लसीकरणाला प्रारंभ 

राष्ट्रीय महामार्गाची वैशिष्ट्ये

- या रस्त्याची देखभाल पुढे पंधरा वर्षे कंपनी करणार

- यावर सात उड्डाणपूल तर नऊ छोटे पूल यांचा समावेश

- अक्कलकोट बायपास रस्त्यावर सहा बस निवारा केंद्र

- या मार्गावर दुतर्फा 9000 पैकी 3080 तर दुभाजकात 17000 पैकी 8300 वृक्ष रोपे लावून पूर्ण

- हा महामार्ग महाराष्ट्र व कर्नाटक यांना जोडणारा दुवा ठरणार

- अक्कलकोट शहरातून येणारी जिवघेणी जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने जाणार

हेही वाचा: अक्कलकोट सखी ग्रुपची बबलाद पूरग्रस्तांना दिवाळीची अनोखी भेट !

आता तालुक्याच्या नजरा तडवळ मार्गे टाकळी रस्त्याकडे

अक्कलकोट तालुक्यातील सर्व महामार्ग पूर्ण होत आले त्याला अपवाद आहे तडवळ मार्गे टाकळीचा प्रस्तावित महामार्गाचा. गेल्या तीन चार वर्षांपासून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, पण या प्रस्तावित मार्गावर चांगला रस्ता नाही म्हणून वाहतूक कमी आहे. म्हणून नवीन महामार्ग मंजुरी मिळत नाही. हा रस्ता झाल्यास मराठवाडा हा अक्कलकोट मार्गे कर्नाटक व गोवा जोडणारा महत्त्वाचा महामार्ग होऊ शकतो. यावर तातडीने मार्ग निघावा अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.

(the akkalkot solapur highway will be completed in five months)

loading image