esakal | तिसऱ्या लाटेपूर्वी सुरक्षिततेसाठी लसीकरणाचा पर्याय! वेग वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणाचा वेग वाढला

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी ठेवून तिसऱ्या लाटेच्या चिंतेने कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वी सुरक्षिततेसाठी लसीकरणाचा पर्याय! वेग वाढला

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी ठेवून तिसऱ्या लाटेच्या चिंतेने कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. मंगळवारी (31 ऑगस्ट) जिल्ह्यात विशेषत: ग्रामीणमध्ये विक्रमी लसीकरण (Vaccination) झाले. एकाच दिवशी 56 हजार व्यक्‍तींचे लसीकरण पार पडले. त्यामध्ये तब्बल 43 हजार व्यक्‍तींनी लसीचा पहिला डोस घेतला.

हेही वाचा: मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

जिल्ह्यातील 18 वर्षांवरील जवळपास 36 लाख व्यक्‍तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये शहरातील सात लाख तर उर्वरित व्यक्‍ती ग्रामीणमधील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 10 लाख 11 हजार 594 व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. तर त्यापैकी तीन लाख 93 हजार व्यक्‍तींनी दुसराही डोस घेतला आहे. जिल्हाभरात लसीकरणाची 191 केंद्रे असून त्यात शासकीय 159 तर 32 खासगी केंद्रे असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा होते. परंतु, संबंधित रुग्णाचा मृत्यू होत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी दोन्ही डोस टोचून घेऊन सुरक्षित राहण्याच्या हेतूने लसीकरणासाठी गर्दी वाढत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मंगळवारी पुणे जिल्ह्यात सव्वादोन लाख डोस टोचण्यात आले तर सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. जिल्ह्यातील जवळपास 56 हजार व्यक्‍तींचे लसीकरण करण्यात आले. मुंबईत 54 हजार, चंद्रपूर जिल्ह्यात 43 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील 36 हजार व्यक्‍तींचे मंगळवारी लसीकरण झाले, असेही डॉ. पिंपळे म्हणाले. काही तालुक्‍यांमधील लसीकरण पिछाडीवर असून, आता गावस्तरावर लसीकरण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: अक्कलकोटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई! 20 लाखांचा; दहा वाहने जप्त

शहरात नाहीत पुरेशी लसीकरण केंद्रे

ग्रामीणमध्ये 151 केंद्रांवरून लसीकरण सुरू असून ग्रामीणमधील नागरिक आता लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु, शहरात लसीकरणाचा वेग कमी आहे. मंगळवारी शहरासाठी दहा हजार डोस देऊनही तेवढ्या प्रमाणात लसीकरण झाले नाही. शहरात अवघ्या 40 केंद्रांवरच लसीकरण सुरू असून लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे. केंद्रांमध्ये वाढ केल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढेल आणि तिसऱ्या लाटेपूर्वी बहुतेक लोकांना सुरक्षित करता येईल, असा विश्‍वासही डॉ. पिंपळे यांनी या वेळी व्यक्‍त केला.

loading image
go to top