सोलापूर जिल्ह्यात आजपासून लसीकरण होणार सुरू

जापनीज मेंदूज्वर ; १५ ते १८ वर्षे वयोगटातील व्यक्‍तींसाठी कोरोना लस
सोलापूर जिल्ह्यात आजपासून लसीकरण होणार सुरू
Sakal
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात(solapur) जापनीज मेंदूज्वर तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील व्यक्‍तींसाठी सोमवारपासून (ता.३) कोविड लसीकरण मोहीम (covid vaccination)राबविण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमांची तयारी पूर्ण झाली असून लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा परिषद प्रशासन(jilha parishad solapur) सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.(Vaccination will start from today in Solapur district)

सोलापूर जिल्ह्यात आजपासून लसीकरण होणार सुरू
अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी!

जिल्ह्यामध्ये जापनीज मेंदूज्वरच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागाला ८ लाख ९४ हजार ३५७ व सोलापूर महानगरपालिका हद्दीसाठी १ लाख ८२ हजार असे एकूण जिल्ह्याला १० लाख ७६ हजार ३५७ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये १ वर्ष ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना जापनीज मेंदूज्वरची लस दिली जाणार आहे. पहिले दोन आठवडे संस्थेमध्ये तर पुढील लसीकरण गावनिहाय करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामपंचायत विभागाची मदत घेतली जाणार आहे. या सर्वांना प्रशिक्षण देऊन मोहिमेचे स्वरूप व उद्दिष्टपूर्तीसाठीचे नियोजन केले असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात आजपासून लसीकरण होणार सुरू
राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

१५ ते १८ वर्षे वयोगटातील २ लाख २६ हजार ४१२ लाभार्थींसाठी कोवीड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी कोवॅक्‍सिन ही लस देण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात उद्या (सोमवारी) ग्रामीण भागामध्ये ११ ठिकाणी या लसीकरणाची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर सर्व आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. सर्वांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन वरील दोन्ही लसीकरण मोहीम यशस्वी कराव्यात असे आवाहन जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Collector S. Kartikeyan interacts with farmers during a visit to drought-affected areas in Mangalwedha.
Solapur E-Bus Service
DCC Election Draft Voter List Under Scrutiny With 370 Objections From Sangola Madha And Pandharpur Talukas
Madgyal sheep conservation farm in Ranjani seeks infrastructure development and additional facilities
Marathi News Esakal
www.esakal.com