
-मोहन कोळी
चिंचणी : उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥
आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट ।
भेणें जाहले दिप्पट । पळति थाट दोषांचे ॥२॥
श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज या मुख्य पालखी सोहळ्यासह इतर संतांच्या पालखी सोहळ्यांचे आज पंढरपूर तालुक्यात आगमन झाले. या सर्व पालखी सोहळ्याचे पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर चिंचणी येथे तालुका प्रशासनाच्या वतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.