शदर पवारांबाबतच्या वादग्रस्त पत्रकाशी वक्ते महाराजांचा काही ही संबंध नाही

Vakte Maharaj has nothing to do with Sharad Pawars controversial paper
Vakte Maharaj has nothing to do with Sharad Pawars controversial paper
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विषयी काढलेल्या वादग्रस्त पत्रकाशी ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांच्या दुरान्वये संबंध नाही. खोडसाळपणे हे पत्रक काढले आहे, अशी माहिती निवृत्ती महाराज वक्ते यांच्या मानस कन्या रुक्मिणी देवकते यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार हे हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. देव धर्म मानत नाहीत. समर्थ रामदासांचा त्यानी ऐकरी उल्लेख केला आहे. त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे पत्रक वक्ते महाराजांच्या नावे राष्ट्रीय वारकरी परिषदेने हे पत्रक काढले आहे. हे पत्रक प्रसिध्द झाल्यानंतर वारकरी महाराज आणि राजकीय नेत्यांमध्येच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज त्याच्या मानस कन्या रुक्मिणी देवकते आणि नातू शुभम वक्ते यांनी या पत्रकाशी वक्ते महाराजांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. रायकर महाराजांनी केवळ प्रसिध्दी मिळवण्याच्या हव्यासापोटी केल्याचा आरोप ही यावेळी वक्ते महाराजांच्या अनुयायींनी केला आहे. ज्ञानेश्वर कदम, सखराम मोहिते, नारायण तोडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com