Shivjayanti 2020 : सोलापुरातील कोणत्या मंडळाचा काय कार्यक्रम वाचा (Video)

Various events in Solapur for Shiv Jayanti
Various events in Solapur for Shiv Jayanti

सोलापूर : शिवजयंतीनिमित्त शहरात मुख्य रस्त्यांसह अनेक गल्लीबोळात उभारण्यात आलेले मंडप आणि लावण्यात आलेल्या झेंड्याने सर्व परिसर भगवामय झाला आहे. काही दिवसांत मंडळांनी आपपल्या भागात शिवमृर्तीची प्रतिष्ठापना करून विद्युत रोषणाई केली आहे. शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे माहितीपट, पोवाडे यांनी परिसर दुमदुमन गेला.

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर मंडळांकडून अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. यावर्षी अनेक मंडळांनी मिरवणुकीचा खर्च टाळून सामजिक उपक्रम राबवण्याचा मानस "सकाळ'कडे व्यक्त केला आहे. रक्तदान शिबिर, अन्नदान, गरजूंना मदतीसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यावर यावेळी मंडळांनी भर दिला आहे.

कोणाचे काय असणार उपक्रम...
अशोक चौक येथील शिवगर्जना बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या मंडळाची स्थापना होऊन 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा मिरवणुकीला फाटा देत सामाजिक उपक्रम करणार असून त्यात खाऊवाटप, आरोग्य शिबिर, अन्नदान, रक्तदान आणि विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. 
- प्रशांत घोडके, अध्यक्ष,
 शिवगर्जना बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व मंडळ, अशोक चौक 

संत तुकाराम चौक येथील शिव बहुउद्देशीय शिव प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मंडळाची स्थापना होऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. मिरवणूक न काढता गरजू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 
- राकेश कोरे, अध्यक्ष, 
शिव बहुउद्देशीय शिव प्रतिष्ठान, संत तुकाराम चौक 

अशोक चौक येथील शहीद अशोक कामटे शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे. या मंडळाची स्थापना होऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंडळाने यावर्षी मिरवणुकीला फाटा देत महाराजांची स्थापना करून शांततेने जयंतीची सांगता करणार आहे. 

- प्रदीप बुर्ले, अध्यक्ष, 
शहीद अशोक कामटे शिवजन्मोत्सव मंडळ, अशोक चौक

पोलिस मुख्यालयासमोरील शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने 12 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या मिरवणुकीत 3 डी मॅपिंगद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ले व राजवाडा दाखविण्यात येणार आहे. त्यासोबतच मिरवणुकीत दोन हजार कार्यकर्त्यांचे लेझीम पथक असणार आहे. 
- अक्षय शिंदे, उत्सव अध्यक्ष, 
शिवराम प्रतिष्ठान 

पोटफाडी चौकातील खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाची स्थापना 1982 मध्ये झाली. मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त यंदा मिरवणुकीत शामियाना उभारून महाराजांचा शाही दरबार सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 60 शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते लक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. 
- सुनील कामाटी, संस्थापक-अध्यक्ष, 
खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळ 

नवी पेठेतील भगवा आखाडा तालमीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त यंदा मिरवणूक न काढता मिरवणुकीत येणाऱ्या खर्चाच्या रकमेतून पुढील महिन्यात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्नेहालय किंवा दत्त चौकातील पाखर संकुलातील अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात येणार आहे. 
- सनी देवकते, अध्यक्ष,
भगवा आखाडा तालीम 

पार्क चौकातील शिवप्रकाश प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. यंदा साधेपणाने मात्र साजेसे असा मंडप उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या अगोदर पार्क चौकातील चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा 11 शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. 
आपल्याकडील फोटो वापरावा 
- गणेश वानकर, संस्थापक-अध्यक्ष,
 शिवप्रकाश प्रतिष्ठान

गेल्या सहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही किसान संकुल परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यासह विविध उपक्रम राबवित आहेत. बुधवारी महिलांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीची पूजा केली जाणार आहे. सर्व युवा पिढी शिवरायांच्या विचाराने राष्ट्रासाठी एकत्र यावी यासाठी आम्ही महाराजांची जयंती साजरी करत आहोत. 
- संतोष आकुडे, संस्थापक, 
श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मंडळ, किसान संकुल 

होटगी रोडवरील जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने यंदा विमानतळ ते आसरा चौक मार्गावरील दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या माध्यमातून दुभाजकांत सुशोभीकरण होणार आहे. बुधवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त सामूहिक पाळणा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुचाकीवरून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी वृक्षारोपण करण्यात येईल. 
- बालाजी चौगुले, संस्थापक, 
जय महाराष्ट्र तरुण मंडळ, होटगी रोड 

शिवसंदेश शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने समाजोपयोगी सामाजिक कार्यक्रम आयोजिले जात आहेत. यंदा आमच्या ग्रुपचे संस्थापक योगेश पवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कमी शब्दांत सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या 500 प्रती वाटप करण्यात येणार आहेत. बुधवारी मिरवणुकीत शिवप्रेमींना पुस्तके भेट देण्यात येतील. या माध्यमातून बौद्धिक व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 
- राहुल गोयल, अध्यक्ष, 
शिवसंदेश शिवजन्मोत्सव मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com