Solapur Crime: वरवडेत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; तलवार-चाकूचा धाक दाखवत ११ लाखांचा ऐवज लंपास

Varwade Midnight Theft Gang Steals Gold and Cash Worth 11 Lakhs: वरवडे गावात मध्यरात्री तलवार-चाकूच्या धाकावर सलग तीन घरांवर धाड; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोटारसायकल असा ११ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास
Varwade Midnight Theft Armed Gang Steals Gold Jewellery Cash and Motorcycle Worth 11 Lakh Rupees One Thief Arrested

Varwade Midnight Theft Armed Gang Steals Gold Jewellery Cash and Motorcycle Worth 11 Lakh Rupees One Thief Arrested

esakal

Updated on

-संतोष पाटील

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील वरवडे येथे पाच जणांच्याचोरट्याच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री बारा ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान तलवार व चाकू यासारख्या प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून अक्षरश: धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली. वरवडे गावामधील अनेक घरांना लक्ष करीत तीन घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने,रोख रक्कम,मोबाईल व मोटारसायकल असा एकूण 11 लाख 31 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान वरवडे येथील ग्रामस्थ व पोलीसांनी या चोरट्यांचा पाठलाग करून त्यामधील एका चोरट्यास पकडले असून त्याचे अन्य चौघे साथीदार पळून गेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com