सोलापुर ः विदेशातील लॉकडाऊनमध्ये व्हीसा व विमानसेवेच्या पेचप्रसंगात अडकलेल्या भारतीयांसाठी व्हीडीओ कॉलींगवर होत संपुर्ण कुटंबाचा एकाचवेळी होत असलेला थेट संवाद महत्वाचा आधार ठरला आहे.
सध्याच्या स्थितीत भारतासोबत इतर देशात देखील कोरोना व्हायरसमुळे होम क्वारंटाईनची अमंलबजावणी सुरु आहे. यामध्ये विदेशात जन्माला आलेल्या भारतीय बालकांच्या व्हीसाचा पेच आहे. या बालकांना व्हीसा मिळण्यासाठी आठ महिन्याचा कालावधी लागतो. तो पर्यत भारतात परत येणे शक्य होत नाही. ही प्रक्रीया ऑनलाईन असली तरी त्यानंतर विमान सेवा सुरु होण्याची अडचण महत्वाची ठरणार आहे. व्हीसा मिळूनही विमानसेवा सुरु झाली नाही तर त्यासाठी देखील थांबावे लागणार आहे.
अनेक देशातील कोरोना चा वाढता संसर्ग पाहता विमानसेवेचे नियम अधिक कडक होण्याचा अंदाज विदेशातील भारतीयांना येऊ लागला आहे. .
या सर्व स्थितीत सध्या होम क्वारंटाईन मध्ये काळजी घेत असताना व्हीडीओ कॉलींग हा एकमेव आधार ठरला आहे. व्हीडीओ कॉलद्वारे भारतातील पालक अगदी सहजपणे त्यांच्या मुलांना थेट समोरसमोर होणाऱ्या संवादाने बोलु शकत आहे. एरवी या सेवेचे महत्व साधारण असले तरी घरात अडकून पडल्याने आता या व्हीडीओ कॉलचा सर्वात उपयुक्त वाटतो आहे. या व्हीडीओ कॉलद्वारे केवळ एका व्यक्तीशी नव्हे तर सर्व कुटूंबाशी संवाद साधणे शक्य होते आहे. एकाच वेळी अनेकाशी बोलणे जमत असल्याने साऱ्या कुटुंबाच्या एकत्र गप्पा उपयुक्त ठरत आहेत.
रोजच्या काॅलींगमुळे दिलासा
सध्या भारतात येण्यासाठी व्हीसा व विमानसेवेचा पेच असला तरी व्हीडीओ कॅालने कुटुंबीयाशी संवादाचे नाते घट्ट होत आहे - मल्लीकार्जून आळंगे टेक्सास अमेरिका
सर्व कुटुंबाचा संवाद महत्वाचा
माझा मुलगा टेक्सासमध्ये असून दररोज व्हीडीओ कॉलद्वारे आम्ही आमच्या नातीसोबत बोलतो व सर्वाचे एकत्र बोलणे देखील होत आहे. त्यासाठी व्हीडीओ कॉल उपयुक्त ठरतो आहे- राजप्पा आळंगे, सोलापूर.