
Four Jagadgurus addressing the Hubli religious conference, emphasizing the unity of Veerashaiva and Lingayat communities.
Sakal
हुबळी : वीरशैव आणि लिंगायत हे एकच आहेत. संविधानानुसार नवीन धर्माला मान्यता नाही. नवीन धर्म स्थापन करण्यापेक्षा असलेला धर्म विकसत करणे चांगले, या मुद्द्यावर लिंगायत समाजातील सर्वोच्च स्थान असलेले चार जगद्गुरू, शेकडो शिवाचार्य आणि कर्नाटकातील दोन माजी मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी भर दिला. यातून लिंगायत समाज हा हिंदूच असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.