
- दयानंद कुंभार
वडाळा : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील ज्ञानेश्वर अप्पाराव करंडे या शेतकऱ्याने दर नसल्यामुळे चक्क शेपू आणि कोथिंबिरीच्या प्लॉटमध्ये रोटावेटर फिरवला. शेपू, कोथिंबीर या भाज्यांना सध्या सोलापूर बाजार समितीत कवडीमोल दर मिळत आहे. भाजीची काढणी व वाहतूक दर ही परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.