वैराग-बार्शी मार्गावर चिखलामुळे घसरली वाहने 

Vairag Barshi Road.jpeg
Vairag Barshi Road.jpeg
Updated on

वैराग : वैराग- बार्शी मार्गावर चिखलमय रस्त्यांमुळे अनेक वाहने घसरून पलटी झाली. दोन दिवस झालेल्या पावसात या मार्गावरील दडशिंगे (ता. बार्शी) येथील गावपाटीजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. भंडारे यांच्या शेताजवळ रस्त्यावर मोठा चिखल होऊन अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पलटी झाल्याचा प्रकार घडला आहे. या भागात दोन वेळा पाऊस झाला. यामुळे दोना दिवसात तीन वाहने पलटी झाली आहेत. दुसरा मार्ग नसल्याने या मार्गावरील वाहतूक करणारे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. चिखलात पडून गाड्या नादुरुस्त तर प्रवासी जखमी झाल्याच्या घटनेत वाढ होत आहे. 

बार्शी तालुक्‍यात सोलापूर-बार्शी हा रस्ता मोठा वर्दळीचा मार्ग आहे. सध्या या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र, याभागात दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता अरुंद असून बाजुला मोठमोठे खड्डे, दगड पडले आहेत. रस्ता चिखलय झाल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय चिखलामुळे दुचाकी जागेवर थांबवल्या जात आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारी वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. तर चाकीचार वाहने घसरली जात असून त्यांचे नुकसान होत आहे. चारचाकी-क्‍लुजर-जीप, बोलेरो, मालवाहतूक छोटा-हत्ती अशी तीन वाहने खड्यात पडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यात, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय एसटी महामंडळाच्या बसेस या ठिकाणी रस्ता सोडून दुसरीकडे जात असल्याचे एका एसटीचालकाने सांगितले. बार्शीकडे जाणारी क्‍लुजर जीप क्रमांक - एम.एच .13 सी एस 3207 ही पलटी होऊन गाडीची वरचाके झाले होती. यातील चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले. असल्याचे वाहनचालकांने सांगितले. वाहन चालकांनी रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहने सावकाश चालवावीत. रस्ता दुरुस्ती होईपर्यंत वाहने सावकाश हाकावी व होणारे अपघात टाळावेत. असा सल्ला पोलिस सदाशीव गवळी यांनी दिला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com