
सोलापूर: मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकारकडून तीन कोटींचा निधी मिळाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी सरकारने सुरुवातीला एक कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र, आता नव्या निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुल योजना विकास निधी हा एक कोटीवरुन पाच कोटी रुपये इतका करण्यात आला आहे.