esakal | "कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला?
sakal

बोलून बातमी शोधा

Vigilance due to coronavirus in Pandharpur

एरवी श्री विठ्ठल मंदिरात दिवसातून दोन ते तीन वेळेला स्वच्छता केली जाते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशातून आणि परदेशातून देखील भाविक येत असतात. या भक्तांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दिवसभरात सहा ते सात वेळा मंदिरात स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे.

"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.

एरवी श्री विठ्ठल मंदिरात दिवसातून दोन ते तीन वेळेला स्वच्छता केली जाते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशातून आणि परदेशातून देखील भाविक येत असतात. या भक्तांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दिवसभरात सहा ते सात वेळा मंदिरात स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क मागविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे झालेला नसला तरी केवळ दक्षता म्हणून उपाययोजना केल्या जात असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या बाबतची सविस्तर बातमी थोड्याच वेळात....

loading image