
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. निधी उपलब्ध असतानाही या प्रकल्पाची गती मंदावली आहे. उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या. तर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही उड्डाणपुलाचे भूसंपादन १५ मे पर्यंत पूर्ण करण्यासाठीची मुदत दिली.