महिलेवर अत्याचार! भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SHRIKANT DESHMUKH
महिलेवर अत्याचार! भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महिलेवर अत्याचार! भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सोलापूर : अविवाहित महिलेच्या इच्छेविरुध्द शारीरीक अत्याचार करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला आहे. पण, ते उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याने न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत अटक करू नये, असे पोलिसांना आदेश दिले आहेत.

श्रीकांत देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (बुधवारी) सुनावणी पार पडली. त्यावेळी ते न्यायालयात उपस्थित नव्हते. परंतु, त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात जाणार असल्याने २६ ऑगस्टपर्यंत त्याना अटकेपासून अभय मिळाले आहे. पण, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने श्रीकांत देशमुखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. जिल्हा सरकारी वकिल ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी विविध न्यायनिवाडे सादर करीत युक्तीवाद केला. दरम्यान, देशमुखाने त्या पीडित महिलेचे काही अश्लिल व्हिडिओ बनविले आहेत का, त्याने फोटो काढले आहेत का, याचा तपास करून ते जप्त करण्यासाठी त्याला जामीन देऊ नये, असाही युक्तीवाद ॲड. राजपूत यांनी यावेळी केला. न्यायालयाने देशमुखांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारी वकिलांचे ‘हे’ चार मुद्दे ठरले महत्त्वाचे…

  • महिलेवर दुष्कर्म करणारा श्रीकांत देशमुख याने भाजपची फसवणूक व बदनामी केली आहे. ज्या पक्षाने आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले, अनेक पंतप्रधान दिले, त्याच पक्षाला देशमुखाने फसविले.

  • श्रीकांत देशमुख हा विवाहित असतानाही त्याने अविवाहित महिलेसाबेत शारीरीक संबंध ठेवले. त्यातून त्याने स्वत:च्या पत्नीची फसवणूक केली आहे.

  • देशमुख याने पीडित महिलेच्या इच्छेविरूध्द सातत्याने शारीरीक अत्याचार केले. तुळजापूर येथे जाऊन मंगळसूत्र घालून खोटा विवाह केला. तिचीदेखील त्याने फसवणूक केली आहे.

  • पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार करण्याचा अधिकार त्या महिलेच्या पतीलादेखील नाही. तरीसुध्दा श्रीकांत देशमुख याने पीडितेसोबत अनैसर्गिक अत्याचार केले.

Web Title: Violence Against Women Former Bjp District Presidents Pre Arrest Bail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaBjpCongressNCP