
सोलापूर : चुलत बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी नववधूच्या चुलत भावालाच मारहाण केल्याची घटना उपळाई बुद्रुक (ता. माढा) येथे घडली आहे. फिर्यादी बापू सुरेश रोमन यांच्या चुलत बहिणीचा ६ मे रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी रोमन यांच्यासोबत एकाचे किरकोळ भांडण झाले होते.