
सोलापूर : भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री पाकिस्तानी हद्दीत १०० किमी घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडले. पाकिस्तानातील भारत विरोधी कारवाया करणारी ठिकाणे उद्ध्वस्त करून जिहादी दहशतवादाविरुद्ध युद्ध असेच लढावे लागते, असा संदेश जगाला दिला आहे. या हल्ल्याने भारताने अंतर्गत आणि बाह्य शत्रूंना इशारा दिला आहे.