
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. पश्चिम द्वारावरील जतन व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन करून भाविकांना पूर्वीप्रमाणे पश्चिम द्वारातून बाहेर जाता येणार असल्याची माहिती मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.