
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर केली जाणारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा बुधवारी (ता. १६) होणार आहे. दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.