

Pandharpur Vitthal Temple Tightens Rules, Improves Devotee Facilities in Queue
sakal
पंढरपूर: अधिक मासनिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविकांचे जलद आणि सुलभ पद्धतीने देवाचे पदस्पर्श दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने १५ जूनपर्यंत व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज दिली. दरम्यान, तीव्र उष्णतेपासून भाविकांचे संरक्षण व्हावे तसेच थंडावा निर्माण व्हावा, यासाठी दर्शन रांगेमध्ये स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. यामुळे भाविकांना ऐन उकाड्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.