
पंढरपूर : श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. येणाऱ्या भाविकांचे जलद आणि सुलभ पद्धतीने देवाचे पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी विठ्ठल मंदिर समितीने तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उद्या (रविवारी) पहिली टोकन दर्शनाची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान काही त्रुटी किंवा समस्या दिसून आल्यास, त्यावर पुढच्या काळात काम करण्यात येईल, असे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.