Controversy at Pandharpur: मंदिर समितीकडून अल्प दरामध्ये लाडू प्रसाद विक्री केला जातो . दरम्यान, याच लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क आळी आणि बुरशी असल्याचे संबंधित भाविकाने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
Devotees express outrage after an insect was found inside laddu prasad packet at Vitthal Temple, Pandharpur.Sakal
पंढरपूर: विठुरायाच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क आळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता. 31) समोर आला आहे. मंदिर समितीच्या या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराविषयी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.