
पंढरपूर : ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती’ संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे. पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे.