esakal | ब्रेकिंग! महापालिकेच्या 'एवढ्या' अधिकाऱ्यांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg

'या' अधिकाऱ्यांनी दिले स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज 
विजयकुमार राठोड, सिध्देश्‍वर उस्तुरगे (उपअभियंता), विजय जोशी, हणमंत आदलिंगे (सहायक अभियंता), ए. ए. जोशी (आवेक्षक), अंजली बटगिरे (मिश्रक), सुहास उंडाळे (कार्यालय अधिक्षक), राहुल कुलकर्णी (लघूलेखक), संजय तांदळे, अजित देगावकर (वरिष्ठ श्रेणी लिपीक) आणि श्रीपाद तुळजापूरकर (स्टेनो). 

ब्रेकिंग! महापालिकेच्या 'एवढ्या' अधिकाऱ्यांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : डोक्‍यावर कामाचा अतिरिक्‍त ताण अन्‌ कोरोनाची भीती, अशा द्विधा मन:स्थितीतील 11 अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज सुपूर्द केले आहेत. मात्र, त्यापैकी सहायक अभियंता विजय जोशी आणि हणमंत आदलिंगे यांचेच प्रस्ताव आयुक्‍तांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.

महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे त्यांच्यातील दरी वाढत आहे. कामाचा अतिरिक्‍त भारामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांना कामाचा ताण सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. 20 वर्षे सेवा बजावल्यानंतर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येते. कोरोना काळात राज्य सरकारनेच स्वेच्छानिवृत्तीसंबंधी स्वतंत्र आदेश काढले आहेत. सोलापूर महापालिकेतील 11 अधिकाऱ्यांनी 30 वर्षे सेवा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्या अर्जांची पडताळणी सामान्य प्रशासन विभागामार्फत सुरू झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची कोणत्या कामानिमित्त चौकशी सुरु आहे का, त्यांच्याकडे महापालिकेची येणेबाकी आहे का, याची खातरजमा केली जात आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे सोपविले जाणार आहेत. मात्र, या अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर शासनाच्या निर्बंधामुळे नवीन पदभरती करणे महापालिकेला कठीण जाणार आहे. स्वेच्छानिवृत्ती मागणाऱ्यांमध्ये दोन लिपिकांचा समावेश असल्याने महापालिकेत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

'या' अधिकाऱ्यांनी दिले स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज 
विजयकुमार राठोड, सिध्देश्‍वर उस्तुरगे (उपअभियंता), विजय जोशी, हणमंत आदलिंगे (सहायक अभियंता), ए. ए. जोशी (आवेक्षक), अंजली बटगिरे (मिश्रक), सुहास उंडाळे (कार्यालय अधिक्षक), राहुल कुलकर्णी (लघूलेखक), संजय तांदळे, अजित देगावकर (वरिष्ठ श्रेणी लिपीक) आणि श्रीपाद तुळजापूरकर (स्टेनो). 

दोन लिपिकांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती 
महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी लिपिक पदावर पदोन्नती घेतलेल्या तब्बल 563 लिपिकांची संगणक व टायपिंग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत नापास होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळपदावर पाठविण्याची नोटीसही बजावली. टायपिंगची परीक्षा नुकतीच पार पडली असून त्यामध्ये नऊ जणांनी दांडी मारली. दरम्यान, आयुक्‍तांनी पहिल्या टप्प्यात या लिपिकांची टायपिंग परीक्षा घेतली. दोन-तीन दिवसांत त्यांचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर त्यांना संगणक परीक्षा द्यावी लागणार आहे. दोन्ही परीक्षेत नापास होणाऱ्या तथा दोनपैकी एका परीक्षेत पास होणाऱ्यांवर काय कारवाई होणार, आयुक्‍त त्यांना फेरपरीक्षेसाठी किती दिवसांची मुदत देणार, याकडे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन लिपिकांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

loading image
go to top