सातशे "एसटी'मध्ये व्हीटीएस प्रणाली ! मोबाईल ऍपद्वारे कळणार लोकेशन

सातशे "एसटी'मध्ये व्हीटीएस प्रणाली कार्यान्वित ! मोबाईल ऍपद्वारे कळणार लोकेशन
VTS Systeme
VTS SystemeCanva
Updated on

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागातील 700 बसमध्ये व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर : एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागातील 700 बसमध्ये व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (Vehicle tracking system) बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक बसस्थानकात स्क्रीनदेखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता एसटीची लाईव्ह माहिती स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. लवकरच मोबाईल ऍपद्वारे प्रवाशांना एसटीची माहिती मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (VTS system has been implemented in all ST buses in Solapur division)

VTS Systeme
...आणि आजी मृत्यूच्या दारातून माघारी फिरल्या ! काय घडलं नेमकं?

राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) सर्वच बसमध्ये जीपीएस म्हणजे ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात येत आहे. याद्वारे एसटी महामंडळाच्या बस जीपीएस प्रणाली आणि मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन होणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सोलापूर विभागातील 700 बसला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. सध्या कार्यालयात संगणकाच्या माध्यमातून अधिकारी गाडीचे लाईव्ह लोकेशन पाहात आहेत. येत्या काळात मोबाईल ऍपदेखील सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या मोबाईल ऍपद्वारे प्रवाशांना घरबसल्या बसची माहिती मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

VTS Systeme
सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

ठळक बाबी

  • विभागातील प्रत्येक बसच्या मार्गाचे होणार मॅपिंग

  • प्रत्येक थांब्याची होणार नोंद

  • लोकेशन आणि बसचा समजणार वेग

  • शहरातील बसस्थानकासह तालुक्‍यांतील बसस्थानकांवर स्क्रीन बसविण्याचे काम पूर्ण

  • आगार व्यवस्थापक यांना या यंत्रणेद्वारे बसची मिळणार माहिती

बसचे लाईव्ह लोकेशन कळणार

सोलापूर बसस्थानकात दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक बसचे लाईव्ह लोकेशन या स्क्रीनवर प्रवाशांना पाहता येत आहे. लवकरच मोबाईल ऍपचे काम पूर्ण होऊन प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.

सोलापूर विभागातील सर्व बसमध्ये व्हीटीएस ही अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आली आहे. बसस्थानकामध्ये स्क्रीनदेखील बसविण्यात आले आहेत. लवकरच मोबाईल ऍपदेखील कार्यान्वित होऊन प्रवाशांना त्याद्वारे बसची माहिती मिळणार आहे.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com