
सोलापूर : दक्षिण आफ्रिकेमध्ये ८ जून रोजी झालेल्या ९० किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या वाघचवरे बंधूनी जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. १९२१ पासून दक्षिण आफ्रिकेत डर्बन व पीटर्मरीसबर्ग या शहराच्या दरम्यान ही कॉम्रेड मॅरेथॉन भरवली जाते. डॉ. स्मिता झांजुर्णे (बहीण) तसेच डॉ. सत्यजित वाघचवरे व डॉ. अभिजीत वाघचवरे या तिघा भारतीय भावंडांनी ही स्पर्धा पूर्ण केली.