esakal | आम्हाला सर्दी, पडसं अन्‌ खोकला काहीही त्रास नाही! वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानाची ओढ
sakal

बोलून बातमी शोधा

आम्हाला सर्दी, पडसं अन्‌ खोकला काहीही त्रास नाही !

आम्हाला सर्दी, पडसं अन्‌ खोकला काहीही त्रास नाही !

sakal_logo
By
मोहन काळे

आषाढी वारी एकाच दिवसावर आली आहे. कोरोनामुळे पंढरपूर व जवळच्या गावांत संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : आम्ही आता पंढरपूरजवळ (Pandharpur) आलोय बरं. सर्दी, पडसं, खोकला तसला आमाला काहीच त्रास नाही. पण इथून संचारबंदी सुरू झालीय. त्यामुळं आता पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी किमान चंद्रभागेचं (Chandrabhaga River) स्नान तरी व्हावं, एवढंच मागणं पांडुरंगाला असल्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या काही वारकऱ्यांनी रोपळेत (ता. पंढरपूर) आल्यावर आपल्या घरच्या लोकांशी भ्रमणध्वनीवरून सांगितले. (Warakaris who have entered Pandharpur want to bathe in the river Chandrabhaga-ssd73)

हेही वाचा: विठुरायाच्या भेटीला आतुरलेल्या वैष्णवांच्या मेळ्याची यंदा आठवणच!

आषाढी वारी (Ashadhi Wari) एकाच दिवसावर आली आहे. कोरोनामुळे (Covid-19) पंढरपूर व जवळच्या गावांत संचारबंदीची (Curfew) कडक अंमलबजावणी केली जात आहे. रोपळेतही बार्शी - पंढरपूर रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संचारबंदीची माहिती नसलेले वारकरी आता पंढरपूरच्या जवळ असलेल्या गावागावांत नेहमीच्या ठिकाणी थांबले आहेत. रोपळेतही काही वारकरी थांबले आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून आलेल्या काही वारकऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी, आम्ही कोरोनाच्या लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले असून कोणाच्याही संपर्कात जात नसल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करत असून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीशिवाय आम्ही काहीही वाटेत घेत नसल्याचेही सांगितले.

हेही वाचा: शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश !

पंढरपुरातील संचारबंदीची आम्हाला माहिती नव्हती. आम्ही शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पंढरपुरात न जाता केवळ चंद्रभागेचे स्नान करून परत जाणार आहोत.

- बाळकृष्ण महाराज भवर, शेकटा, ता. पैठण, जि. औरंगाबाद

आम्ही कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करतोय. आम्हाला निदान चंद्रभागा नदीत स्नान करण्याची परवानगी द्यावी.

- दादाराव ढिगोळे, खोडेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

loading image