
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. वारकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नाही. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हा आमच्यासाठी व्हीआयपी आहे. त्यांना केंद्र बिंदू मानूनच राज्य सरकारने वारीचे नियोजन केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. दरम्यान शिंदे यांनी पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्री. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर असे पाय जाऊ विठुरायाचे मुख दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.