
सोलापूर : मार्चअखेरमुळे महावितरणकडून वीजबिल थकबाकी वसुली मोहीम वेगाने राबविली जात आहे. वीजबिल वसुलीवेळी थकबाकीदार ग्राहक आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वादविवादाच्या घटना घडतात. यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत थकबाकीदारांची मजल जाते. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. अशा घटनांत महावितरणने थेट फौजदारी कारवाई केली आहे.