
सोलापूर : महापौर बंगल्याजवळील एका नामांकित शाळेत एलकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकलीचा सहा महिन्यांपासून लैंगिक छळ करणाऱ्या फ्रान्सिस आशिष पिंटो (वय ५५) या शिपायाला सदर बझार पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची वाढीव पोलिस कोठडी ठोठावली आहे. आता पोलिसांनी शाळेतून जप्त केलेल्या २० दिवसांतील १०० तासांच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे.