
महूद : नीरा उजवा कालव्यातून शेतीला तत्काळ पाणी मिळावे, या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील खिलारवाडी व पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी, पळशी, तिसंगी येथील शेतकऱ्यांनी नीरा उजवा कालव्यात अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर संबंधित विभागाने दहा ते बारा मेपर्यंत पाणी दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.