
सोलापूर : अर्धा तास पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून येत्या महिनाभरात शहराचा पाणीपुरवठा एका दिवसाने कमी करण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. ज्या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा आहे त्या ठिकाणी चार दिवसाआड आणि ज्या ठिकाणी चार दिवसाआड पाणीपुरवठा आहे त्या ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.