Pacific Ocean low Pressure
esakal
सोलापूर : प्रशांत महासागरात कमीदाबाचा पट्टा निर्माण (Pacific Ocean low Pressure) झाल्याने राज्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. प्रशांत महासागरातील तापमान थंड होत आहे. महासागराचे तापमान २८ अंश से. असणे अपेक्षित असताना ते आता १५ ते २० अंशावर गेले आहे. विशेष म्हणजे मे महिन्यापासून अशीच स्थिती आहे. ही स्थिती १० ऑक्टोबरपर्यंत अशीच राहणार असल्याची माहिती डॉ. रामचंद्र साबळे (Dr. Ramchandra Sable) यांनी दिली.