Solapur Rainfall
esakal
सोलापूर : जिल्ह्यात पुन्हा पावसाने (Solapur Rainfall) थैमान घालण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने (Red Alert) हजेरी लावली आहे. आधीच पुराने सगळं धुऊन नेलं आणि आता आणखी किती पाणी येणार? म्हणजे सावरण्याआधीच विस्कटणार, अशी स्थिती झाली आहे. सीना काठच्या काही घरांमध्ये राहण्यास गेलेल्या लोकांना पुन्हा घर सोडावे लागत आहे. तशीच स्थिती भीमाकाठी देखील झाली आहे. तर शहरातील आदिला नदीला पूर आला आहे आणि होटगी आणि हिप्परगा दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.