

Weaver icon Gangadharpant Kuchan obituary Maharashtra news
sakal
सोलापूर : येथील माजी खासदार तथा विणकररत्न गंगाधरपंत सिद्रामप्पा कुचन (वय ९१) यांचे मंगळवारी (ता. १२) पहाटे हृदयविकाराने निधन झाले. सकाळी नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव पद्मनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. सायंकाळी पाचपर्यंत राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील मान्यवर तसेच समाजबांधवांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.