MlA Abhijit Patil : गडी लय तयारीचा, म्हणून मला माढावाल्याने स्वीकारलं

आमदार होण्याचे ध्येय समोर ठेवून गेली दोन वर्ष मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघात घर ना घर गेल्यामुळे एक नातं निर्माण झालं
mla abhijit patil
mla abhijit patilsakal
Updated on

मंगळवेढा - आमदार होण्याचे ध्येय समोर ठेवून गेली दोन वर्ष मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघात घर ना घर गेल्यामुळे एक नातं निर्माण झालं. त्या दोन वर्षातील पंढरपूर- मंगळवेढ्यातील तयारी बघून गडी लय तयारीचा म्हणून मला माढा वाल्याने स्वीकारलं प्रतिपादन आ. अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

येथील उद्योजक वैभव नागणे यांच्या पुढाकारातून कल्पतरू परिवार, व्ही. एन. ग्रुप यांच्या वतीने आ. समाधान आवताडे,आ.उत्तम जानकर, आ. राजू खरे, आ.अभिजीत पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे हे होते यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव, मानाजीराव माने, संजय कट्टे, दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात, जयनारायण कोंडूभैरी, प्रकाश गायकवाड, ह.भ.प. तुकाराम महाराज, रामचंद्र वाकडे, उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. अभिजीत पाटील म्हणाले की, लढायची जिद्द मनामध्ये ठेवून कमी काळात पंढरपूर व मंगळवेढातील मतदाराशी संपर्क वाढवला परंतु ऐनवेळी उमेदवारी माढ्यातून निश्चित झाल्यामुळे 78 गावातील नवीन माणसं शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे कमी दिवसात मला आमदार होता आले.

परंतु माझ्या आमदारकीतला सर्वाधिक वाटा हा पंढरपूर -मंगळवेढ्यातील जनतेचा आहे. लढायची जिद्द निर्माण झाल्याने लढत राहिलो,आणि लढता- लढता जिंकता आल्याने मी आमदारकीच्या माध्यमातून आपले प्रश्न विधानसभेत मांडू शकलो सध्या या व्यासपीठावरील तिघे आ. राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून पंढरपूरच्या दृष्टीने धडाकेबाज माणूस हवा आहे.

सगळे मिळून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू आ. समाधान आवताडे यांच्याकडे सुचक इशारा करत तुम्हाला आतनं व बाहेरून जेवढी मदत करता येईल तेवढी करा असे आवाहन केले. यावेळी आ. उत्तम जानकर यांनी आगामी निवडणुकी विधानस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्योजक वैभव मागणे यांना विधानपरिषद आमदार करण्यासाठी प्रयत्न करूया.

आमदार समाधान आवताडे यांनी आमदार अभिजीत पाटील यांनी आमदार होण्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे कौतुक करून इकडून दणका दिला तिकडे गेले, तिकडून दणका दिला, आता तर आ. राजाभाऊचे नेतृत्व मान्य केल्यामुळे त्यांना इकडे यावं लागेल असे सांगतात उपस्थितीतून हशा पिकला, तर भाषणातील एक व आतील एक यावरून खुद आ.अवताडे यांना देखील हसू आवरेना.

अध्यक्ष पदावरून बोलताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, मी सध्या राजकारणापासून दूर गेल्यामुळे सध्या बऱ्याच कार्यक्रमात मला अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. असे सांगून व्यासपीठावरील सर्व आमदारांनी जिल्ह्यातील सर्व भागाला उजनीचे पाणी कसे देता येईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उद्योजक वैभव नागणे यांनी केले. कार्यक्रमासाठी कल्पतरू परिवार, व्हीन एन ग्रुप आणि राणाप्रताप ग्रुप यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com