सोलापूर : यंदा विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून साखर कारखान्यांशी संबंधित असलेले १७ जण निवडून आले आहेत. हे साखर कारखानदार निवडणूक प्रचारातून मोकळे झाल्यावर ऊसदर जाहीर करतील, ही अपेक्षा फोल ठरल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. .Maharashtra Assembly Result : निकालानंतर व्हीव्हीपॅटची मते मोजण्याची मागणी.त्यामुळे सत्तेवर येताच महायुती सरकारला ऊसदर प्रश्नाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. साखर कारखान्यांवर वरचष्मा असलेल्या नेत्यांनाच सर्वपक्षीयांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना प्राधान्य दिले. या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आलेल्या १७ जणांत भाजपचे सर्वाधिक ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेनेचे एक, जनसुराज्य शक्तीचे एक असे महायुतीचे १२, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे २ आणि अपक्ष १ आमदार आहे. उर्वरित काही आमदारांच्या कुटुंबीयांचा कारखाना असून अप्रत्यक्षरीत्या त्याच्याशी संबंधित आहेत. .गेल्या दशकभरात ’साखर गोडीतून’ पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड मिळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश आल्याचे आणि अजित पवारांशी ’नवे मैत्र’ अन्युती ’महा’ युती बनण्यामागचे कारणही हेच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, केंद्र सरकारने आधारभूत ऊसदर जाहीर केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात साखर कारखान्यांच्या ऊस गाळप हंगामाला सुरवात झाली. प्रचारात व्यस्त साखर कारखानदार निवडणूक निकालानंतर ऊसदर जाहीर करतील, ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती..मात्र, त्यानंतर आठवडा उलटल्यावरही कोणी ’ब्र’ काढण्यास तयार नाही. ऊस गाळपाला जाऊन १५ दिवसांनंतरही किती दर मिळणार याची शाश्वती मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी धुमसत आहे. लवकर नव्या सरकारचा शपथविधी होईल अन्आपला प्रश्न सुटेल, याकडे शेतकरी डोळा लावून बसला आहे. त्यामुळे नवे सरकार अधिकारावर येताच ऊसदर प्रश्नाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे..ऊसदराची घोषणा न झाल्यास शेतकरी आक्रमकजिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजारांचा दर देण्याची घोषणा करूनही अन्य साखर कारखानदार त्याची घोषणा करण्यास तयार नाही. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन चिघळले होते. सद्यःस्थिती पाहता पुन्हा तशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भरभरून दिलेली मते पाहता नवे सरकार साखर सम्राटांच्या दबावाला बळी न पडता त्यांना योग्य ऊसदर देण्यास भाग पाडेल, अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे..जिल्हानिहाय साखर कारखानदार असलेले आमदार व राजकीय नेतेसोलापूर ः समाधान आवताडे (भाजप), अभिजित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)सांगली ः जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), विश्वजित कदम (काँग्रेस)कोल्हापूर ः हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), अमल महाडिक (भाजप), विनय कोरे (जनसुराज्य शक्ती), राजेंद्र पाटील - यड्रावकर (शाहू विकास आघाडी), चंद्रदीप नरके (शिवसेना), राहुल आवाडे (भाजप)सातारा ः मकरंद जाधव - पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल भोसले (भाजप), शंभुराज देसाई (शिवसेना), शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)पुणे ः अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल कुल (भाजप).Maharashtra Assembly Result : निकालानंतर व्हीव्हीपॅटची मते मोजण्याची मागणी.शेतकऱ्यांनी कारखानदारांना मते देऊ नयेत, असे अनेक वर्षांपासून ओरडून सांगत आहोत. कारण सत्तेवर आणि विरोधात तीच मंडळी आहेत. साखर कारखाने हे लुटीचे साधन तर त्यांची आमदारकी ही त्यासाठीचे कवचकुंडल आहे. शेतकऱ्यांनी त्यांना नाकारल्यास ते निवडून येऊ शकत नाहीत. परिणामी आम्हीही हतबल झालो आहोत.- राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.