काय कराव या चोरट्याला, गॅस, शेगडी अन्‌ गहू-तांदूळसुध्दा ठेवले नाही घरात

3By_20thieves_2.jpg
3By_20thieves_2.jpg
Updated on

सोलापूर : सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र.एक येथील आकाश मोहन खलसे यांच्या घरात सोमवारी (ता. 29) रात्री चोरट्याने चोरी केली. घर बंद असल्याने चोरट्याने संधी साधली आणि घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील गॅस सिलेंडरची टाकी, गॅस शेगडी, एक लाकडी कॅरम बोर्ड आणि गहू व तांदूळ प्रत्येकी दहा किलो असा एकूण दोन हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. खलसे यांना घरातील साहित्याची चोरी झाल्याचे समजताच त्यांनी सलगर वस्ती पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस हवालदार श्री. शिंदे त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.



विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
सोलापूर : शहरातील कोरोना वाढत असतानाही बेशिस्तीपणाचे दर्शन नेहमीच पोलिसांना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 104 जणांकडून तब्बल 52 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर महापालिका आयुक्‍तांच्या निर्बंधाचे पालन न केल्याने तीन दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून 14 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या चौघांकडून दोन हजारांचा दंड वसूल केला.



खुनातील आरोपीकडून रुग्णालयातील रुग्णाला मारहाण
सोलापूर : बहिणीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून शेळगी येथील विशाल सुरवसे याने नितीन उबाळे याचा शनिवारी (ता. 27) खून केला. त्यानंतर पोलिसांनी सुरवसे याला अटक केली असून न्यायालयाने त्यास दहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. परंतु, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना वॉर्डातील एका रुग्णाने डोळ्यावर चष्मा लावला होता. माझ्यासमोर गॉगल घालून फिरतो का म्हणत विशाल सुरवसे याने त्या रुग्णाला दवाखान्यातच मारहाण केली. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला आता किमान दहा दिवस त्याच ठिकाणी ठेवावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी वाढवून घेतली जाईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com