कोरोना संसर्गात श्रावण महिन्याचे उपवास करताना काय खावे? जाणून घ्या 

shravan upwas.jpg
shravan upwas.jpg
Updated on

सोलापूरः श्रावण महिन्यामध्ये उपवासाची संख्या मोठी असते. सोमवारपासून ते अनेक सणांचे उपवास व त्यासोबत स्वतः हून घेतलेल्या व्रताचे उपवास अनेक जण करतात. या वर्षीचा श्रावण महिना हा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वेगळा आहे. या महिन्यात प्रत्येकाला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वतःची प्रतिकारक्षमता टिकवून धरत उपवासाचे नियोजन करावे लागणार आहे. 

श्रावण महिन्यात अनेक प्रकारचे उपवास केले जातात. श्रावण सोमवार सोबत अनेक सणाचे उपवास आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या क्षमतानुसार हे उपवास करतो. या वर्षी कोरोना संसर्गामुळे यावर्षी उपवासाचा ताण शरीरावर नसावा या पध्दतीने नियोजन करणे गरजेचे आहे. या बाबत डॉक्‍टर व आहारतज्ञांनी या वर्षीच्या श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ घेण्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण केली आहे. 

उपवासाच्या पदार्थामध्ये पोषणमुल्ये अधिक असणाऱ्या पदार्थांचा समावेशाची आवश्‍यक्त आहे. तसेच शरिरातील पाणी पातळी योग्य असावी. कोरोना संसर्गाच्या उपचारात हवी असलेली जीवनयुक्त सी चा अंतर्भाव असलेली फळांचा उपयोग करावा लागणार आहे. उपवास म्हटले की केवळ शावूदाना व भगर एवढेच पदार्थ फराळासाठी वापरणे कोरोनाच्या काळात संपुर्ण पोषण देण्यासाठी हे उपयुक्त नाहीत. सध्या लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून आहेत. घराबाहेर पडण्याचे काम नसल्याने प्रत्येकाचा आहार वाढला आहे. तसेच वेळ असल्याने उपवासात चमचमीत पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. मात्र सध्याच्या स्थितीत हे उपयुक्त नाही. शाबुदाणा वडे तळून तयार करणे व त्यासोबत तळलेल्या मिरच्या खाणे अत्यंत चुकीचे आहे. 
मुळात शाबुदाणा हा पित्त वाढवणारा पदार्थ आहे. त्याला इतर पचनास सोपे असलेल्या पदार्थाचे पर्याय शोधले पाहिजेत. तसेच शाबुदाण्यातील स्टार्च देखील शरीरासाठी फारशी उपयुक्त नाही. शिंगाड्याचे पीठ, नाचणी व भगरीची भाकरी देखील उपयुक्त आहे. 

डाळिंब, कच्चे अंजीर, संत्री, मोसंबी, केळी या सारखी ऋतुनुसार उपलब्ध असणारी फळे भरपूर प्रमाणात असावीत. फळांमध्ये असलेल्या फ्रुक्‍टोजमूळे शरीराची साखरेची गरज भागते. खिरीचे प्रकार देखील पोषणासाठी उत्तम आहेत. राजगिरा व नाचणी हे शाबुदाण्यापेक्षा पचण्यास हलके आहेत. खजूर व सुका मेव्याचे प्रकार वापरावेत. गुळापासून केलेली शेंगदाणा चिक्की, रताळ्याच्या फोडी देखील करता येतात. नारळ, शहाळी व खोबऱ्याची वडी पोषक आहेत. मधुमेह व ह्दयरोगाच्या रुग्णांनी उपवास करू नयेत. 
लाल भोपळा (काशीफळ) पासून बनवलेले पदार्थ देखील उत्तम पोषण देतात. दुध, दही, लोणी काढलेले ताजे ताक, लोणी व तुपाचा वापर करावा. उपवासासाठी भरपूर शरबतांचा वापर केल्यास त्याचा शरिरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. लिंबु शरबत, कोकम, सोलकढी, खस, उसाचा रस आदी शरबताचे प्रकार वापरावेत. 

गुळाच्या पदार्थांना प्राधान्य द्यावे 
अनेक प्रकारची फळे उपवासाच्या काळात घ्यावीत. शाबुदाणा हा पित्त वाढविणारा आहे. त्यापेक्षा खजूर, गुळापासून बनवलेले पदार्थ, फळांचा वापर करता येईल. श्रावण महिन्यातील उपवास हे पावसाळी दमट वातावरणात उपयुक्त असतात. मात्र, सध्याच्या स्थितीत पोषणमुल्ये असलेले पदार्थ उपवासात असावेत. 
- निलीमा हरिसंगम, आहार तज्ञ 

कोरोना संसर्गाचे नियम पाळा 
श्रावणाचे उपवास हे कोरोना संसर्गाच्या काळातील आहेत. हे लक्षात घेऊन पुरेसा आहार घेताना हळदीचे दूध, गरमपाणी घेण्यास विसरू नये. उपवासाचा शरीरावर ताण न येता फळे व शरबतांनी शरीराचे पोषण करता येईल. 
- डॉ. सौ. किरण पाठक, आयुर्वेद तज्ञ 

कडक उपवास नको 
कडक उपवास कोरोनाच्या काळात नसावेत. भाजणीचे पीठ, फळे, ताजे ताक वापरावे. शरिरात पाण्याची पातळी उत्तम राहील असा आहार असावा. गुळ शेंगदाणे व गुळाचे इतर प्रकार वापरता येतील. 
- अमृता बोल्ले आहारतज्ञ 

 फळे व गुळाचे पदार्थ उपयुक्त 
श्रावणात अळीवाचे लाडू किंवा खीर पोषक आहे. सी जीवनसत्व असलली फळे उत्तम ठरतात. मधुमेहींनी गुळाचे पदार्थ खाउ नयेत. इतरांनी साखरेपेक्षा रसायने नसलेला काळा गुळ फराळात वापरावा. 
- श्रध्दा पडसलगीकर, आहारतज्ञ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com