

Tragedy in South Solapur: Father Takes Extreme Step After Poisoning Children
sakal
द. सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावालगतच्या शेतात नेऊन तीन लहान मुलांना विष पाजल्यानंतर पित्याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. भीम अणप्पा वाघमारे (वय ३४, रा. तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. तर प्रगती (वय ८), प्रतीक (वय ६) आणि प्रतीक्षा (वय ४) या तिन्ही चिमुकल्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.