

Uncertainty Prevails in Solapur as Key Decision Awaits from Top Leadership
Sakal
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला ६८ पैकी ३८ जागा मिळाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीत कोणाला बसवायचे? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनात अन् डोक्यात चाललंय तरी काय? याचा अंदाज नव्या सदस्यांनाही लागताना दिसत नाही. दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत उत्सुकता वाढू लागली आहे.