esakal | तीस सेकंदांसाठी जीव झाला वेडापिसा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Social media

सोशल मीडियाला आपल्या बोटांच्या तालावर नाचवणाऱ्या आजच्या या तरुणाईमध्ये आयुष्यातील प्रत्येक घटनेला सोशल करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या सोशल मीडियाशी अतूट नाते जोडणाऱ्या तरुणाईला प्रत्येक गोष्टीत अपडेट राहणे हे नेहमीच आवडणारे असते. मग ती गोष्ट सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक. त्यामुळे ही तरूणाई सध्या व्हॉट्‌सऍप स्टेटसच्या 30 सेकंदांमध्ये गुरफटली असून, त्याद्वारे आपल्या भावना व विचार व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. 

तीस सेकंदांसाठी जीव झाला वेडापिसा ! 

sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सोशल मीडियाला आपल्या बोटांच्या तालावर नाचवणाऱ्या आजच्या या तरुणाईमध्ये आयुष्यातील प्रत्येक घटनेला सोशल करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या सोशल मीडियाशी अतूट नाते जोडणाऱ्या तरुणाईला प्रत्येक गोष्टीत अपडेट राहणे हे नेहमीच आवडणारे असते. मग ती गोष्ट सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक. त्यामुळे ही तरूणाई सध्या व्हॉट्‌सऍप स्टेटसच्या 30 सेकंदांमध्ये गुरफटली असून, त्याद्वारे आपल्या भावना व विचार व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. 

सोशल मीडिया म्हणजे तरुणाईचे व्यासपीठ बनले आहे व त्यावरील स्टेटस, प्रतिक्रिया, मेसेजेस म्हणजे तरुणांचा आवाज आहे. त्यात सध्या व्हॉट्‌सऍप स्टेटस म्हणजे सर्वजण आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. वाढदिवस, परीक्षा, सणसूद, प्रेरणादायी विचार, रोमॅंटिक गाणी, शेरो-शायरी, इमोशनल गाणी, प्रपोझ व्यक्त करणाऱ्या डायलॉगचे व्हिडिओज, जयंती तसेच अनेक आनंदाच्या क्षणांच्या शुभेच्छा देखील या माध्यमातूनच दिल्या जात आहेत. मित्रासोबत भांडणे झाली, कोणी मन दुखावले असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला टोमणे मारण्यासाठी देखील व्हॉट्‌सऍप स्टेटसचा वापर केला जात आहे. 

विशेष म्हणजे या 30 सेकंद स्टेटसच्या माध्यमातून आज कोणाचा काय मूड आहे, तसेच कोण कुठे फेरफटका मारत आहे हेसुद्धा कळते. एकंदरीत, या स्टेटस अपडेटमधून प्रत्येकाच्या आवडी-निवडींचे, विचारांचे व अंतर्मनातले कोडे समजत असून, प्रत्यक्षात एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संवाद साधताना स्टेटस अपडेट म्हणजे "एक घाव सौ निशाणा' असेच काही आहे. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वापर आणि त्याद्वारे आपले स्टेटस अपडेट करणे याची सध्या मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. 

स्टेटसच्या माध्यमातून युवक आपल्या भावना प्रकट करताना दिसत आहेत. एखाद्याने 30 सेकंदांचे ठेवलेले व्हिडिओ पाहून काहीजण त्याचे अनुकरण करून तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. यात काही नकारात्मक, सकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. 
- डॉ सुभाष पाटील,
पाटील हॉस्पिटल, माढा 

सध्या तरुणाईचा प्रभाव स्टेटसवर जास्त आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या व्हिडिओ अथवा फोटोच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तीला न बोलता संदेश द्यायचा असतो. स्टेटसच्या माध्यामातून एकमेकांच्या भावना समजतात. 
- बाळकृष्ण गायकवाड,
व्हिडिओ क्रिएटर, माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top